माझे पान

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 19 January 2017


ज्ञानरचनावाद
          मुलांना शिकवण्याची गरज नाही. मूल निसर्गतः शिकते . त्यासाठी फक्त योग्य वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी आपली. विद्यार्थी स्वतःच ज्ञानाची निर्मिती करत असतो. शिक्षकांनी विद्यार्थ्याला केवळ  शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यायची असते. यासाठी शिकणे व शिकवणे या प्रक्रियेचे नैसर्गिक स्वरूप समजावून घेत आपणही काही प्रयोग केले की गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही हे नक्की .

          यासाठी गरज आहे ती शिक्षक म्हणून आपण प्रत्येकाने स्वतःच्या नवनिर्माण क्षमतेतून , विविध कृतींच्या  माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची गोडी निर्माण करणे. विद्यार्थ्याला नवीन ज्ञान ग्रहण करण्यासाठी प्रोत्साहित करणे . यासाठी केवळ आणि केवळ गरज आहे ती शिक्षकाने  स्वतःला झोकून देऊन बालक हिताचा ध्यास घेण्याची . आपण हे नकीच करू शकतो .